HW News Marathi
महाराष्ट्र

12 आमदारांबाबत शब्द खर्च करणार नाही, शरद पवारांचा थेट राज्यपालांना इशारा!

मुंबई। राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी गेल्या 8 महिन्यांपासून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. आता या पुढे 12 आमदारबाबत आग्रही नाही असं राज्यपाल बोलले होते. पण, आता ‘शहाण्याना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे 12 आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी इशारा दिला आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून राज्यपालांना कडक इशारा दिला आहे. राज्यपालांनी पुण्यात बोलत असताना राज्य सरकारला आवश्यकता नाही, असा टोला लगावला होता. त्यावरून शरद पवारांनी आपल्या शैलीत सणसणीत उत्तर दिले आहे.

राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही

‘यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले, तिन्ही पक्षाचे नेते पत्र देऊन आले. पण राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही, असा सणसणीत टोला पवारांनी राज्यपालांना लगावला.तसंच, ‘आता ‘शहाण्याना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे 12 आमदारांबाबत शब्द खर्ची घालणार नाही, असा थेट इशाराच पवारांनी दिला.

महिला खासदारांना धक्काबुक्की केली

तर, राज्यसभेत महिला खासदारांना झालेली धक्काबुक्की, पेगसेस आणि कृषी कायदे रद्द करा, पेट्रोल डिझेल ची महागाई कमी करा या मागण्या होत्या. केंद्र सरकारचं म्हणणं होतं की आम्ही चर्चा करू पण केंद्र सरकारच्या वतीने कुठेही लेखी पत्रिकेत हे नमूद केलं नाही. अशा परिस्थितीत त्यांनी विमा विधेयक आणलं. याला आमचा विरोध होता. या गोंधळात सुरक्षा रक्षक आले आणि त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की केली. संसदेच्या इतिहासात असा प्रकार आजपर्यंत घडला नाही. संसद सदस्यांवर हा एक प्रकारचा हल्ला होता, अशी टीकाही पवारांनी केली मिनिस्टर मीडिया समोर भूमिका मांडतात म्हणजे यातून केंद्र सरकारची बाजू कमकुवत आहे हे सिद्ध होते. 40 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफा आणने हे लोकशाही च्या दृष्टीने घातक आहे, असंही शरद पवार म्हणाले.

‘पाकिस्तान , चायना असताना अफगाणिस्तान ही भारताची नवी डोकेदुखी बनेल. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका यात परिस्थिती बदलत आहे, आता आपल्या परराष्ट्र धोरणाची कस लागेल, असंही पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ११ एप्रिलपासून सुरु होणार

News Desk

राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा राम मंदिराच्या उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे – सुजय विखे

News Desk

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढलेलं दिसतंय, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

News Desk