HW News Marathi
महाराष्ट्र

Nisarg cyclone | शरद पवार करणार २ दिवसांचा कोकण दौरा

मुंबई | निसर्ग’ चक्रीवादळाने महाराष्ट्राला झोडपून काढले. अनेक जिल्ह्यांना मोठा फटक बसला. कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जून आणि १० जून असा दोन दिवसांचा ते दौरा करणार आहेत. ९ जूनला रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. त्यामुळे शरद पवार माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन या ठिकाणी भेट देऊन तेथील आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासोबत बैठकही घेणार आहेत. त्यानंतर ते दापोलीला भेट देणार असून तिथेच ते मुक्काम करणार आहेच. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सुदामवाडी गाव प्रथम 

News Desk

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आता १७ जानेवारीला होणार सुनावणी

Aprna

पवार – फडणवीसांच्या भेटीत रहस्य वाटत असेल तर ते पवारांना ओळखत नाही! – सामना

News Desk