HW News Marathi
Covid-19

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी सीएम फंडालासाठी उघडली तिजोरी!

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली तिजोरी उघडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहायत फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात दिला आहे.

लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण २ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

सर्व आमदार-खासदारांचं महिन्याचं वेतन देणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचे वेतन सीएम फंडात देणार आहेत. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन, जयंत पाटील यांनी केलं.

काय आहे ट्विट?

शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच सर्वप्रथम राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्षांना दिल्या. दिरंगाई न होता तातडीने ही मदत मिळावी यासाठी पवारांनी एका कागदाच्या कोपऱ्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात या सूचना लिहून पाठवल्या.

रुग्णालयात असतानाही पवारसाहेब सातत्याने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती असो रुग्णालयात असतानाही पवारसाहेब रोज परिस्थितीचं अवलोकन करत होते. नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण साहेबांच्या ध्यानात आला आणि त्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पक्षसहकाऱ्यांना तातडीने मदतनिधीसंबंधीच्या सूचना दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान फक्त ४ तासच झोपतात, मुख्यमंत्र्यांनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे

News Desk

राज्यभरातील केंद्रीय संस्थांनी आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मुख्यमंत्र्यांची मागणी

News Desk

राज्यातील कडक निर्बंध आणखी १५ दिवसांसाठी वाढले

News Desk