HW News Marathi
महाराष्ट्र

पार्थ पवारांच्या’त्या’ ट्विटरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया !

पुणे | मराठा आरक्षणावरुन सध्या राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी मराठा आरक्षण प्रकरणात उडी घेतली आहे. पार्थ सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी ट्विट केले होते. यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी पार्थ यांच्यावर बोलणे टाळले. तसेच, मराठा आरक्षणावरून कोणतेही राजकारण नको अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.

तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार देखील कोर्टात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर दहा जणांनी जावे. काहीही झाले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावावी हीच सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच, अजित पवार यांनी आज पार्थ पवारांची भूमिका ही राष्ट्रवादीची नाही असे म्हटले होते यावर शरद पवार म्हणाले की ते काय म्हणाले मला माहित नाही. मात्र, राज्य सरकार मराठ्यांच्या बाजूनेच आहे. त्यामुळे मागच्या वेळी पार्थ पवारांना जाहिरपणे फटकारल्यानंतर यावेळी शरद पवारांनी त्यांच्याबद्दल काहीही विधान करणे टाळलेले पाहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावली 

News Desk

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत परळीच्या सावळाराम मंदिरात ‘श्रीराम’ जन्मोत्सव

Aprna

इंदापूर तालुक्यात विमान कोसळले; महिला वैमानिक जखमी

Aprna