HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे पदवीधर मतदार संघातून कोण लढणार? शौमिका महाडिक यांची प्रतिक्रिया…

पुणे | पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान भाजपकडून अजून कोणताही अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही आहे. तर कोल्हापूरच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी याबाबत वक्तव्य केल्याने भाजपकडून पुणे पदवीधरसाठी कोण उमेदवार असेल यावर जोरदार चर्चा रंगली आहे.

यापुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. दरम्यान, आता कोणाची वर्णी लागणार याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. शौमिका महाडिक यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुणे मतदारसंघातून आपल्या नावाची चर्चा होत आहे. परंतु याबाबत मला काहीच माहिती नसल्याने माझ्यासाठी हा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय केली आहे पोस्ट?

सध्या सर्वत्र पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व करावे असे आपणा सगळ्यांनाच वाटते. याआधी मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे या मतदारसंघाचे नेतृत्व केल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळे महत्व आहे. बरेच इच्छुक उमेदवार असताना अचानक माझे नाव पदवीधर मतदारसंघासाठी दावेदार म्हणून लोकांसमोर येणे ही बाब खरंतर माझ्यासाठीही धक्कादायक अशीच होती.

सुरुवातीला समाजमाध्यमांवरुन चालू झालेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष केले पण आता ही चर्चा अधिकच जोर धरू लागल्याने मी माझी भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. आज सर्वच कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना इथे सांगू इच्छिते की, तुम्हा सर्वांच्या इच्छेचा मी निश्चित आदर करते पण पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा माझा कधीच मानस नव्हता आणि तो आजही नाही. त्यामुळे या सर्व चर्चा ऐकून, बातम्या वाचून कोणीही संभ्रमित होऊ नये. एखाद्या निवडणुकीसाठी जर मी इच्छुक असेन तर निश्चित तसे मत उघडपणे आपल्या सर्वांसमोर व पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त करेन. कारण भाजपा हा लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष आहे, आपल्या पक्षामध्ये स्पष्ट मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे छुप्या चर्चा करण्याची मला कसलीही आवश्यकता नाही.

भारतीय जनता पक्षाकडे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करू शकतील असे अनेक सक्षम उमेदवार आहेत. अनेकांनी खूप कष्ट घेऊन या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीसुद्धा केली आहे. त्यापैकी योग्य त्या उमेदवाराला पक्षाने संधी द्यावी. निश्चितच पक्ष देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही सर्वच पदाधिकारी व नेतेमंडळी आदरणीय चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली झोकून देऊन काम करू, हा विश्वास मी देते व थांबते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | …म्हणून चंद्रकांत पाटील आपली पोलीस सुरक्षा परत करणार

News Desk

“येणाऱ्या 4 दिवसांत 4 ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येणार”, किरीट सोमय्यांचा नवा दावा

News Desk

कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका, तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू, मातोश्रीवरून आदेश 

News Desk