HW News Marathi
क्राइम

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन, सीबीआयच्या विनंतीनंतर ६ आठवड्यांची स्थगिती

मुंबई | शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, सीबीआयच्या विनंतीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीनाला ६ आठावड्यांची स्थगिती दिली आहे. यामुळे आता पीटर मुखर्जी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यात वर्तवली जात आहे. या प्रकरणात पीटर मुखर्जीला चार वर्षानंतर जामीन मंजूर झाला होता. मात्र, सीबीआयच्या विनंतीमुळे जामीनला स्थगित दिल्याने पीटर मुखर्जीला अजून काही काळ तुरुंगात काढावला लागणार आहे.

एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जीला याला सीबीआयने अटक केली होती. पीटरवर गुन्ह्याची माहिती लपवणे आणि कटात सहभागी होणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह सर्व आरोपींवर २०१७ मध्ये हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला. यात पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय याच्यावर हत्येचा आरोप निश्चित करण्‍यात आला होता. पोलिसांनी २०१६ मध्ये शीनाची आई इंद्राणी आणि तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय याला अटक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भावाने बहिणीसह तिच्या प्रियकराची केली हत्त्या

News Desk

नागपूरमध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

News Desk

मोक्ष प्राप्तीसाठी ११ जणांची आत्महत्या

News Desk