HW News Marathi
महाराष्ट्र

शेवगाव तालुक्यात उस आंदोलन पेटले video

शेवगाव: ऊसाला ३१०० रुपये दर मिळावा यासाठी बुधवारी अहमनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले. खानापूर घोटण दरम्यान शेतकºयांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी १२ वाहने जाळण्याचे प्रयत्न केला. यामध्ये एसटी बसेस, उसाचे ट्रक, ट्रक्टर व काही खासगी वाहने जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला केला तसेच हवेत गोळीबार केला. तसेच अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. परंतु त्याची पर्वा न करता हे आंदोलन सुरूच होते. स्वाभिमानी संघनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान, आंदोलनात काही शेतकरी जखमी झाल्याचे वृत्त आहे. ऊसाला ३ हजार १०० रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे.

राज्य संघटनेचे शेतकरी रस्त्यावर उतरले होते. बुधवारी पोलिसांनी प्रकाश बाळवडकर, अमरसिंह कदम, शेवगावचे दादासाहेब टाकळकर, संदीप मोटकर, शुभम सोनावळे, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, बाळासाहेब फटांगरे यांच्यासह दहा ते १५ शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संतप्त शेतकºयानी पैठण-शेवगाव रोडवर घोटण, खानापूर, क-हेटाकळी, एरंडगाव, कुडगाव आदी गावांमध्ये रास्ता रोको केला. रस्त्यावर टायर जाळले, रस्त्यावर लाकडे आणून जाळली. पोलिसांकडून लाठीमार सुरू होताच आंदोलकांनी मिळेल, त्या रस्त्याने पळ काढला. याठिकाणी राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, शेवगाव तालुक्यात वातावरण तणावपूर्ण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयलच, पालकमंत्री नवाब मलिकांची माहिती!

News Desk

‘राजू शेट्टी बिनबुडाचा लोटा’ शेट्टी, म्हणतात, कुणाची भाटगिरी करताय?

News Desk

“शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”,उर्जामंत्री भडकले!

News Desk