HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्या होणार युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून गेल्या अनेक दिवसांपासून युतीचे घोंगड भिजत पडले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या (२९ सप्टेंबर) भाजप-शिवसेनेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. ल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडू मिळाली आहे.

दोन्ही पक्षांतील बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचे मुख्य कारण आहे. युती नाही झाली तर दोन्ही पक्षातील इच्छूक उमेदवारांना एका जागेवर संधी मिळू शकते. मात्र युती झाल्यास एका पक्षातील इच्छूक उमेदवाराला त्या जागेवर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नाराजीनाट्य, बंडखोरी किंवा पक्षांतरणामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. यामुळे युतीच्या चर्चे दिर्घाई होत होती.

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन !

“शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन,” असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासाठी मी सर्व प्रयत्न करणार असल्याचे हे वचनपूर्ण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा घेतला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “शिवसेनेचे सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यासाठी हजर होते. मात्र, २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना बोलविण्यात आले म्हणजे युती तुटली असे होत नाही,” असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली ‘ही’ योजना ठाकरे सरकारकडून रद्द  

News Desk

कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणे हीच दोन मोठी आव्हाने !

News Desk

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन

News Desk