HW News Marathi
Covid-19

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे व निलम गोऱ्हेंची नावे निश्चित

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे नावे निश्चित झाली आहे. येत्या २१ मे रोजी मुंबईत विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुंबई, ठाणे, रायगड या मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांच्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी झाल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री ११ मे रोजी उदमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे

विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, आणि शिवसेना १ अशा एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणू जिंकून येण्यासाठी २९ मते आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीला विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. महाविकासआघाडीने विश्वदर्शक ठरावा वेळी १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. मात्र, भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे एकून ११२ सदस्यांचा पाठिंबा आहेत.

शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची कमतरता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. तर विधानसभेत निवडून आलेल्या ५४ व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सहज जिंकून येतील. तर काँग्रेस ४४ सदस्या असून त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

भाजपमध्ये विधानपरिषदेच्या उमेदवारी रस्सीखेच

भाजपचे तीन उमेदवार हे संख्याबळावर सहजरित्या जिंकून येतील. मात्र चौथ्या जागेसाठी भाजपला काही मते कमी पडत आहेत. मात्र, भाजपमध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू झालेली दिसून येत आहे. भाजपकडून विधानसभेचे तिकीड न मिळालेले आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे, नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आणि विधानसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे या नेत्यांची विधानपरिषदेवर चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे भाजप प्रावक्ते भाधव भांडारी, कोकणातून विनय नातू, प्रमोद जठार, भाजपमध्ये नुकतेच आलेले विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजिंतसिंग मोहिते पाटील आणि कराडचे अतुल भोसले यांच्या देखील नाववर चर्चा होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली राज्याच्या ‘मिशन बिगिन अगेन’ची माहिती

News Desk

“हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?”, मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा सवाल

News Desk

राज्यात गेल्या २४ तासांत ५० हजारांच्या पुढे आढळले नवे कोरोना रूग्ण

News Desk