HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आक्रमक, भाजपवर दबाव

मुंबई | विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत भाजपला १०५ जागांसह मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेतली असून सत्ता स्थापनेबाबत युतीत जो निर्णय होईल, तो भाजपकडून लिहून घ्यावा अशी मागणीही शिवसेना आमदारांनी केली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. शिवसेनेने आज (२६ ऑक्टोबर) नवनिर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलविण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजपचा ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. याशिवाय अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावे, असेही ठरले होते, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी आमदारांना बैठकीत दिली. उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक सुमारे १ तास चालली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपची युती अभेद्य आहे. जे ठरलं होतं ते घडणार नसेल तर माझ्यासमोर अन्य पर्याय खुले आहेत. पण मला हे पाप करायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावर सर्व आमदारांनी एकमतानं सत्ता स्थापनेचे निर्णय उद्धव ठाकरेंना दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी सोलापूर शहर मध्य मदरासंघातूनच निवडणूक लढणार | प्रणिती शिंदे

News Desk

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची भौतिक प्रगती २७ टक्के

Aprna

‘कोरोनाची तिसरी-चौथी लाट मुद्दाम आणली जात आहे’, राज ठाकरेंचा आरोप

News Desk