मुंबई | शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहे. आता शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. “मी गद्दार नाही, शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे ?, अनिल परब हा शिवसेनेचा मतदार संघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघालाय,” असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. “शिवसेनेचे नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला. गद्दारांना हाताशी घेऊन स्थानिक कडव्या शिवसेनेच्या आमदारांना बाजुला ठेऊन हा शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला तुमचा अनिल परब निघालाय. गद्दार तो आहे तर घोषणा द्यांच्या असतील तर त्यांच्याविरोधात द्या,” असे कदमांनी आज (१८ डिसेंबर) पत्रकार परिषदेत म्हणाले.
कदम म्हणाले, “जेव्हा मी संघर्ष करत होतो तेव्हा कुठे होता अनिल परब. संघर्ष माझा चाला होता. कणकवलीमध्ये उद्धवजींचा गाडीच्या पुढच्या सिटवर मी बसलेलो होतो. तेव्हा हा होता कुठे?, साधी बांद्र्याची जागा सुद्धा निवडून आणली नाही. आणि आज आमच्या येथे येवून तीन दिवस तिथे थांबून अशा पद्धतीने शिवसेना संपण्याचा घाट करत असेल. तर ते सहन केले जाणार नाही,” असा इशारा कदमांनी परबांना दिला आहे. “ऐवढे मी तुम्हाला सांगतोय. मी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले पाहिजे. मी कधी गद्दारी केली नाही. तुमची वैयक्तिक संपत्ती म्हणजे शिवसेनेची संपत्ती होत नाही. तुमच्या हॉटेलवर बोलो म्हणजे ती शिवसेनेची संपत्ती नाही. अनिल परब म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख नाहीआणि म्हणून उगाच माझ्यावर गद्दारीचा शिक्का लावू नका?, मी कडवट सैनिक आहे. मी कधी डाग लावून घेतला नाही.” “गद्दार गद्दार ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आले. नाईलाजाने आज खेडून येवून तुमच्या समोर आहे. पुढे काय करायचे तो निर्णय आम्ही घेणार माझी मुले, मी, माझे कुटुंबिय आणि जे आमच्या सोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यासोबत बसू आणि लवकरच मी पुन्हा पत्रकार परिषद घ्यायला मी पुन्हा इथे येईन.अन्याय किती सहन करायचा यालापण एक मर्यादा आहे.”
परब काय पक्षप्रमुख झाला का?, कदमांचा सवाल
“मी उद्धवसाहेबांना माझी विनंती आहे, तुमची तब्यात ठिक नाही हे मी समजू शकतो. आदित्यसाहेबांना योगेशने फोन केला. तेव्हा देखील मी अनिल परबांना सांगतो. सुभाष देसाईना फोन केल्यानंतर मी अनिल परबांना सांगतो. तो रत्नागिरीचा आमचा नेता उदय सामंत त्यांना फोन केला तर मी अनिल परबला सांगतो. कोण अनिल परब तो काय पक्षप्रमुख झाला का?तो पालकमंत्री असाल तरी तो पक्ष बांधायला आलाय का तो, अशा पद्धतीने या अनिल परब अनिल परब चालेय. मी उद्धवजींना हात जोडून सांगेन यांच्या डोक्या मस्ती गेली. याचे पाय जमिनीवर नाही येत आणि म्हणून त्यांचे पाय पुन्हा जमिनीवर आणा. मी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्याला हरामखोर म्हटले. त्या हारामखोराला थांबवा. याला मंत्री पद दिले. ते नेत्यांना संपवण्यासाठी नाही. शिवसेना वाढवण्यासाठी आहे. मी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले,” असे कदम म्हटले.
पक्षाच्या विरोधात आमचे कुठलेच काम करणार नाही
“लवकरच मी आपल्याला भेटने, आम्ही सगळे बसणार आहोत. उद्या नगर परिषदेचे निकाल लागले. आम्ही पक्षाच्या विरोधात कुठे काम करणार नाही. माझा मुलगा आणि मी ही जाणार नाही. पक्षाच्या विरोधात आमचे कुठलेच काम करणार नाही. ते निकाल लागतील. तेव्हा मला विश्वास आहे. हे जे गद्दार आहे राष्ट्रवादीचे सूर्यकांत कदम यांचा देखील तेथील जनता निकाल लावल्याशिवाय राहणार नाही, याचा मला विश्वास आहे,” असे ते म्हणाले
मी मरेपर्यंत भगव्याची सात सोडणार नाही.
या सर्व प्रकरणानंतर तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडणार का?, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर कदम म्हणाले, “मी शिवसेनेतून कादापी बाहेर पडणार नाही. मी मरेपर्यंत भगव्याची सात सोडणार नाही. पण माझ्या मुलांच्या भवितव्याचा विचार केल्यानंतर माझी मुले निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. कारण या वयात त्यांच्या मुळावर घाव घातला जातोय. आताच त्यांनी सुरुवात केली होती. अशा वेळेला अनिल परब यांच्या सारखी मानसे तेथे येवून जाहीर सभा घेवून सगळ्या शिवसेनेला अपमानीत करत आहेत. त्यांच्यासोबत मला बसावे लागेल, त्यांच्यासोबत चर्चा विचारावी लागेल. माझे रक्त नासलेले नाही. माझ्या हातून ते कदापी पाप होणार नाही. अगदी मला पक्षातून काढले, मी शिवसैनिक म्हणून जगेन पक्षातून माझी हक्काल पट्टी केली. तरी मी शिवसैनिक म्हणून जगेन. कारण अनिल परब सध्या पक्ष प्रमुख आहेत ना?, त्यांच्याविरोधात बोले म्हणजे मी पक्षाविरोधात बोलेल असेच चाले सगळे पण मी भव्या झेंड्याशी प्रामाणिक आहे. मी लवकरच एक महिन्याच्या आतमध्ये येथे येईल. माध्यमांसमोर बोलेने काय बोलायचे आहे,” असे ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.