HW News Marathi
महाराष्ट्र

पुढच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या बाजुला शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल !

मुंबई | पुढेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजुला शिवेसनेचा मुख्यमंत्री बसलेला असेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. पुढे राऊत म्हणाले की, अब की बार शिवसेना १०० पार असा नारा देखील त्यांनी दिला. विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांच्या रुपाने शंभर तोफांची सलामी शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांना देणार आहोत. असा निरधार शिवसेनेने केला असल्याचे राऊतांनी दसरा मेळाव्यात बोलताना सांगितले.

“जानकर काल म्हणाले की मला भाजपने फसवले, रडत काय बसलाय आमच्याकडे या, असे म्हणत राऊतांनी रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिवसेनेनेत येण्याच ऑफर दिली आहे.” पुढे राऊत म्हणाले की, “आदित्य नावाचे सुर्ययान महाराष्ट्रात फिरून २४ तारीखला मंत्रालयाच्या ६ व्या मजलयावर उतरेल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

संजय राऊत यांचे दसरा मेळाव्यात महत्तावचे मुद्दे

  • संजय राऊत यांची राणेंवर टीका
  • संपूर्ण राज्य वाट बघतो युतीचे राज्य यावे आणि नेतृत्व शिवसेनेचे व्हावे
  • शिवसेनेच्या विजयाची सुरुवात कुडाळ- कणकवली येथून व्हावी
  • ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत वार केले ते आज घायाळ झाले
  • विनायक राऊत पहिला निकाल तुम्ही महाराष्ट्राला सांगावा
  • जानकर काल म्हणाले की मला भाजपने फसवले
  • अरे मग आमच्या मंचावर या अजित पवार सारखे रडत काय बसलात
  • नेता कधी रडतो काय
  • अजित पवार ईडीच्या भीतीने ढसाढसा रडले
  • आदित्य नावाचे सुर्ययान महाराष्ट्रात फिरून 24 तारीखला मंत्रालयाच्या 6 व्या मजलयावर उतरेल
  • पुढच्या विजया दशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसलेला दिसेल
  • आज शिवसेना थोडी शात आहे आहे तयामुळे
  • आज युती झाली त्यामुळे जपून बोलावं लागत. काही बेड्या हातात पडल्या आहेत. कारण आम्ही दोस्ती आणि नाती पाळतो
  • त्यादीवशी उद्धव ठाकरेंना मी म्हणालो आपण 124 जागा लढवत आहोत. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आकड्यात आणि वाकड्यात जाऊ नये
  • आता 124 गड जिंकायचे आहेत
  • 24 तारीखला आपल्याला हे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना गड द्यायचे आहेत.
  • लाटा येतात आणि जातात
  • मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे
  • शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही.
  • शिवसेना ही महाराष्ट्र्र केसरी आणि आता हिंद केसरी आहे. आमच्यासमोर कोणताही पहलावान टिकला नाही
  • पुरे देश मे शोर है महाराष्ट्र मे शिवसेनेका जोर है
  • 2019 च्या निर्णायक लढाईसाठी शिवसेना सज्ज झालीय
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिर्डी द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

News Desk

ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले

Aprna

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ११ एप्रिलपासून सुरु होणार

News Desk