मुंबई | शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीने समन्स बजावला आहे. जाधवांची परदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने जाधवांवर फेमा कायद्याअंतर्गत त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. जाधवांना हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाधवांवर कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याच आरोप केला होता. जाधवांनी मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता. यानंतर आयकर विभागाने जाधवांच्या घरावर छापेमारी केली होती. यात आयकर विभागने जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. जाधवांच्या वांद्र्यातील ५ कोटीचा फ्लॅट आणि भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आयकर विभागाने जप्त केले आहे. जाधवांनी २००२ ते २०१८ दरम्यान जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी बेकायदेशीर मार्गाने पैसे मिळवत ही संपत्ती खरेदी केल्याची माहिती आयकर विभागाचा संशय होता.
दरम्यान, आयकर विभागाने जाधवांवर कलम १३२ ९ (बी) अंतर्गत यशवंत जाधव यांनी कारवाई केली होती. जाधव हे भायखळ्यात वास्तव्यास असून एका भागातील एका इमारतीत तब्बल ३१ फ्लॅटस आहे. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. जाधव यांच्या मुंबईतील माझगावमधील घरी शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) सकाळी आयकर विभागाचे अधिकारी यांच्यासह सीआरपीएफचे जवान दाखल झाले होते. जाधव यांची पत्नी यामिनी जाधव या मुंबई भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. जाधवांवर बेनामी कंपन्यांच्या मदतीने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. जाधवांवर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला असून यूएईला नेहण्याचा बोलले जात आहे. आयकर विभागाने काही दिवसापूर्वी जाधवांना नोटीस पाठवली होती. परंतु, त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली.
जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी आणि ५० लाखांचे घड्याळचा उल्लेख
नुकतेच आयकर विभागने यशवंत जाधव यांच्यावर केलेल्या कारवाईत डायरी सापडली. या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली होती. यासंदर्भात आयकर विभागाने जाधवांना विचारल्यावर ते म्हणाले, “मातोश्री म्हणजे माझ्यासाठी आई आहे,” असे त्यांनी म्हटले होते. डारीत गुढी पाडव्याच्या दिवशी २ कोटी रुपय आणि ५० लाखांचे घड्याळ भेट वस्तू म्हणून मातोशीला देण्याचा उल्लेख केला आहे. जाधव कुटुंबीयांच्या निकटवर्तीय सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी आयकर विभागने छापेमारी केली होती. या छाप्यादरम्यान आयकर विभागाने कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापले असून त्यांनी ते जप्त केले आहे. या पुराव्याच्या झाडाझडततून सुमारे १३० कोटी रुपयापेक्षा जास्त आणि ३६ जुन्या पघडीच्या इमारीत विकत घेतल्याची माहिती उघडकीस आली होती.
यशंवत जाधव, शिवसेना, महाराष्ट्र, आयकर विभाग, ईडी,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.