HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आमदारांची बैठक संपली, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार

मुंबई | राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची आज (२२ नोव्हेंबर) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलविली आली होती. शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर सव्वातास सुरू असलेली बैठक संपली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याच नावावर चर्चा झाल्याची माहिती सेनेच्या आमदारांनी माध्यमांना दिली. तसेच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, येत्या २ दिवसात सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट होईल.

या बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार जयपूरला जाणार नसून मुंबईत एकत्रित राहण्याचे सूचना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याची माहिती सेनेच्या आमदारांनी दिली आहे. लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांकडून देण्यात आली आहे. आशी माहिती सेना आमदारांनी मातोश्रीवर पार पडललेल्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली.

बैठकीला येण्यापूर्वी शिवसेनेकडून त्यांच्या आमदारांना पाच दिवसाचे कपडे, ओळखपत्र घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महाविकासआघाडीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून शिवसेनेच्या आमदारांना कोणी फोडून नये, याची खबरदारी म्हणून या सर्व आमदारांनी पुन्हा एकदा हॉटेलमध्ये ठेवण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबई महापालिकेला 681 कोटी रूपयांना फसवणा-या पालिकेच्याच कर संकलकासह 2 कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

“…याला पुनावाला स्वतः जबाबदार;त्यांना कोण बदनाम करत नाही”, राष्ट्रवादीने सुनावले

News Desk

‘अदानींचं नाव देणं ही सर्वात मोठी चूक’, नवाब मलिकांची संतप्त प्रतिक्रिया!

News Desk