HW News Marathi
महाराष्ट्र

राऊतांचा गौप्यस्फोट! नवनीत राणांनी दाऊदशी संबंधित ‘या’ व्यक्तीकडून घेतले ८० लाखाचे कर्ज

मुंबई। खासदार नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला यांच्याकडून ८० लाख रुपये कर्ज म्हणून घेतले आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत केला आहे. यामुळे राणा दामेपत्याच्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे.

राऊतांनी ट्वीट मध्ये म्हटले, “नवनीत राणा यांनी युसूफ लकडावालाकडून ८० लाखाचे कर्ज घेतले होते. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी युसूफ लकडावाला याला अटक केले होते. परंतु, अटकेत असताना लकडावालाचा कॅन्सरने मृत्यू झाला. आता माझा प्रश्न असा आहे की, या प्रकरणाची ईडीने चौकशी केली होती का?, हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, ” असे ते म्हणाले असून राऊतांनी त्यांच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे.

सध्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा दोघे हनुमान चालिसा प्रकरणी कारागृहात आहेत. नवनीत राणांनी मागासवर्गीय असल्यामुळे हीन वागणूक केले आणि पिण्यासाठी पाणी दिले नाही, असा आरोप मुंबई पोलिसांवर केला होता. नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केली होती. आणि लोकसभा अध्यक्षांच्या सचिवांनी या प्रकरणाचा अहवाल २४ तासांच्या आता मागितला होता. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून राणा दाम्पत्य पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाचा व्हिडिओ ट्वीट केली आहे. 

युसूफ लकडावाला कोण होता

मुंबईतील बिल्डर आणि दाऊदचा फायनान्सर म्हणून युसूफ लकडावाला यांना ओळखले जात होते. ईडीने लकडावाला याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केले होते. लकडावाला याला कॅन्सरमुळे आर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला. २०१९ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका जमीन खरेदी प्रकरणात शासनाच्या कागदपत्रा फेरफार करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप लकडावालाला अटक केली होती. गुजरात विमानतळावरून लंडनला पळून जात असताना अटक केले होते. तसेच बॉलिवूड अभिनेत्री साधन यांना २०१० मध्ये धमकावल्या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव असून केंद्रसरकार नेमकं काम कुणासाठी करतंय – छगन भुजबळ

News Desk

PandharpurElection : पंढरपूरमध्ये पोस्टल मतांची मोजणी सुरु, राष्ट्रवादी की भाजप कोण बाजी मारणार?

News Desk

राज्यपाल भाजप नेत्यांना भेटले, पण महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबतची भेट टाळली ?

News Desk