HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेचे मंत्री फक्त पेन आणि फाईल उचलतात…

पुणे| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासोबत महाबळेश्वरला सुट्टीवर गेल्यामुळे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत शिवसेनेवेर टीका केली आहे. हे सरकार गोंधळलेले आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीने 60 दिवसांत मुख्यमंत्र्यांना थकवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत,अशाप्रकारची टीका नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पुण्याच्या कामशेतमधल्या एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री कारकूनासारखे बसलेले असतात

मंत्रिमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेत असतात, तर शिवसेनेचे मंत्री टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचे काम करत असून ते मंत्रीमंडळात कारकूनासारखे बसलेले असतात, अशी बोचरी टीका राणे यांनी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने हैराण केल्याने मुख्यमंत्री 60 दिवसांतच थकले

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना कधी सुट्टी घेतली किंवा नागपूरला सुट्टीवर गेले असे ऐकले का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सहा वर्षांपासून देशाची सेवा करत आहेत. मात्र ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले असे ऐकलं का? परंतु हे मुख्यमंत्री 60 दिवसातच थकले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना हैराण केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मध्ये कुठेही स्टॉप न घेता थेट महाबळेश्वरला गेले असल्याचे नितेश राणे म्हणाले.

 

Related posts

#RamMandir : उध्दव ठाकरेंनी घेतले प्रभू रामचंद्रांचे दर्शन

News Desk

‘हिरकणी’ला सिनेमागृह न मिळाल्यास पुन्हा एकदा ‘खळ्ळ खट्याक्’

News Desk

काँग्रेसने आपल्या देशाला गेली ५० वर्षे एप्रिल फूल बनवले !

News Desk