HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस स्टेशन तोडफोड केल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वालांना अटक

औरंगाबाद : पोलीस स्टेशनची तोडफोड केल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांना आज पोलिसांनी अटक केली. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसोबत गोंधळ घालून काच फोडल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.औरंगाबाद हिंसाचार प्रकरणीत रविवारी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी कार्यकर्त्यांना का? ताब्यात घेतले. या बद्दल क्रांतीचौक पोलीस स्टेशनमध्ये जाब विचारण्यासाठी प्रदीप जैस्वाल पोहोचले होते. तेव्हा पोलीस आणि जैस्वाल यांच्यात बाचाबाची झाली होती. या गोंधळादरम्यान पोलीस स्टेशनमधील वस्तूंची तोडफोड झाली. पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणी प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज (समोवारी) दुपारी त्यांना अटक करण्यात आले.

जैस्वाल हे औरंगाबादेतील लोकप्रसिद्ध आमदार आहेत. त्यांच्या अटकेमुळे औरंगाबाद मधील वातावरण पुन्हा बिघडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. जैस्वाल यांना सायंकाळपर्यंत कोर्टासमोर उभे कऱण्यात येणार आहे. मात्र जैस्वाल यांनी हिंसाचार प्रकऱणावरून पोलीस निष्पाप नागरिकांना त्रास देत आहे. त्याचाच जाब विचारण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात गेलो होतो, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी अशी प्रतिक्रीया दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंनी फिरवली पाठ

News Desk

“आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय?” 

News Desk

राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावं, अब्दुल सत्तार यांची ऑफर

News Desk