HW News Marathi
महाराष्ट्र

आपलेच दात आणि आपलेच ओठ | उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडूनच दगडफेक

नगर | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर आज पारनेरमध्ये दगडफेक करण्यात आली. शिवसेनेच्याच एका गटाने ही दगडफेक केल्याचे समजते. त्यामुळे पारनेर तालुक्‍यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी ठाकरे पारनेर येथे आज दुपारी आले होते. पारनेर येथील सभा आटोपून ठाकरे हॅलेपॅडकडे जात असताना गाड्यांच्या ताफ्यावर अचानक दगडफेक सुरू झाली. दगडफेक सुरू होईपर्यंत ठाकरे यांची गाडी निघून गेली होती. मात्र आमदार विजय औटी यांच्या गाडीला काही दगड लागले. गाडीची काचही फुटली.

या दगडफेकीत शिवसेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष निलेश लंके यांच्या गटाने ही दगडफेक केल्याची चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसजी, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली? काँग्रेसचा सवाल

News Desk

नाटकांच्या माध्यमातून मिळते आनंदाची अनुभूती! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

उल्हासनगरात पुन्हा पोलिसांवर हल्ला, संतापाचे वातावरण

swarit