HW News Marathi
महाराष्ट्र

महाजाॅब्सवरून शिवसेनेने काँग्रेसकडे व्यक्त केली दिलगिरी !

मुंबई | गेले काही दिवस काही मुद्द्यांवर महाविकासआघाडीत बिघाड असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, सगळं काही सुरळीत सुरू आहे असे पक्षातीलच नेत्यांनी सांगितले होते. मात्र, पुन्हा एकदा कुरबुरी चव्हाट्यावर आल्याचे महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून निदर्शनास आले.

या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होतीच. मात्र, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि या प्रकरणी शिवसेनेकडून दिलगिरी व्यक्त झाल्याचेसुद्धी त्यांनी सांगितले आहे.

टीव्ही ९ मराठीशी बातचीत करताना त्यांनी असे म्हटले की, महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे फोटो असणे गरजेचे आहे. सरकारचा भाग म्हणून सत्यजीत यांनी ट्वीट केले असेल. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.

तसेच, मुख्यमंत्री आणि आमच्यात संवाद वाढला पाहिजे, गेले काही दिवस कोरोना काळात कमी झाला होता, आता मागील आठवड्यात भेटलो होतो. काही विषयावर चर्चाही झाली, अशी माहितीही थोरात यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सामानाच्या मुलाखतीत संवाद असला पाहिजे असे म्हटले होते.

सत्यजित तांबे यांनी काय केले होते ट्विट?

महाजाॅब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, असे ट्विट त्यांनी केले होते.

राजीव सातव यांनी काय केले होते ट्विट?

“योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत”, असे ट्विट सातव यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे सरकारने आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

Aprna

मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक राज्यपालांच्या भेटीला, वडेट्टीवार आणि भुजबळांना हटवण्याची केली मागणी

News Desk

सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, IPS रश्मी शुक्लांचा कोर्टात मोठा  दावा

News Desk