HW News Marathi
देश / विदेश

एकहाती सत्तेचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील ! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

मुंबई। काँग्रसेने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. त्यावरून याआधीच काँग्रेवर विविध स्तरांवर टिका होत आहे. आता शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर जोरदार टिका केली आहे. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय. मी ५५ वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझं अभिवादन. प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सण आहेत, २३ जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, दुसरा म्हणजे १९ जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि १३ ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो आणि केलेच पाहिजे. माझ्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, अशा शुभेच्छा देतानाच गेल्या दीड वर्षात आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात दुखतंय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतंय, ते त्यांचं त्यांनी पाहावं, त्यांना औषध मी नाही देणार. राजकीय औषध मी देईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसवर निशाणा !

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही स्वबळाच्या नाऱ्यावरून टार्गेट केलं. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. स्वबळाचा नारा काय देता? माझ्या रोजी रोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या मराठमोळ्या शिल्पकाराने घडविले स्टॅच्यू ऑफ युनिटी

Gauri Tilekar

शरद पवार ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी पश्चिम बंगालला जाणार !

News Desk

मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने दिले वेळापत्रक – ३ दिवस विरोधक, ४ दिवस समर्थक तर १ दिवस केंद्र सरकार मांडणार आपली बाजू

News Desk