HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेची मोठी घोषणा, नाशिक मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी

नाशिक | आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना सगळ्या जागा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, अशी माहिती शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत ५ दिवसांच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याची माहिती शिवसेनेने दिली. पुढच्या वर्षी नाशिक महापालिका निवडणूक होत आहे, त्यासाठी आता सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र ती पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा – राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरु झालीय. राऊत कुठल्या जोरावर ही गोष्ट बोलताहेत हीच कल्पना विरोधकांना येत नाहीये. त्यामुळेच राऊतांच्या दाव्याविषयी तर्कवितर्क लावण्यास उधाण आलंय.

तिकडं मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची कसून तयारी करतेय. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवक पळवले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. मात्र, असं असलं तरी मनसेची भूमिका कृष्णकुंजवरच ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माहिती आणि प्रसारण खाते मिळालेल्या प्रकाश जावडेकरांबद्दल या गोष्टी जाणून घ्या

News Desk

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ 50 हजार रुपये देणार; मंत्रिंडळाचा निर्णय

Aprna

‘एनआयए’ला आत्मसमर्पणापूर्वी डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी भारतीय लोकांसाठी लिहिलेले खुले पत्र

News Desk