HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना म्हणजे कन्फ्यूज पक्ष, शिवसेनेने आधी भूमिका ठरवावी- फडणवीसांचा खोचक सल्ला

नागपूर | शिवसेना हा अत्यंत कनफ्युज पक्ष आहे अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कृषी विधेयकांवरुन काँग्रेस करत असलेले आंदोलन ही काँग्रेसची लबाडी आहे त्यांना.शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही अशी टीका आधी त्यांनी केली होतीच. आणि त्यानंतर फडणवीसांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे.

शिवसेनेनेही या विधेयकांला विरोध दर्शवला आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शिवसेना हा कनफ्युज पक्ष आहे. याचं कारण लोकसभेतली त्यांची भूमिका वेगळी होती आणि राज्यसभेतली त्यांची भूमिका वेगळी आहे. पण यात नवल काही नाही. शिवसेनेला ही सवयच आहे. ते आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते सत्तेतही सहभागी होते आणि विरोधी पक्षाची भूमिकाही बजावत होते. त्यामुळे लोकसभेत ते वेगळं बोलतात आणि राज्यसभेत वेगळं बोलतात. जे समर्थन करतात त्यांच्यात गेलं तर ते सांगतात आम्ही लोकसभेत समर्थन दिलं आहे. जे विरोध करतात त्यांच्यात गेलं तर सांगतात आम्ही राज्यसभेत विरोध केलाय. खरं म्हणजे शिवसेनेने आधी भूमिका ठरवली पाहिजे”, असा सल्ला देत फडणवीसांनी निशाणा साधला आहे.

शेती संदर्भात शिवसेनेने कधी भूमिका मांडलेली नाही. मला आता त्यांना आव्हान करायचे आहे की, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे तर त्यांनी गॅरंटी घ्यावी ना, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या का झाल्या? याचं उत्तर संजय राऊत देतील का? उगाच शेतकरी प्रश्नावरुन राजकारण करायचं ही गोष्ट सोडली पाहिजे. शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने आधी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे”, असे फडणवीसांनी म्हटले आहे. नागपूरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कॉंग्रेस आणि सेनेवर सडकून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर

News Desk

वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवत मलिकांचा पुन्हा गंभीर आरोप

News Desk

यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

Aprna