HW News Marathi
महाराष्ट्र

“पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी सत्य बोलावं”, पूजाच्या आजीची मागणी

बीड | पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्यमहत्येनंतर राजकीय वर्तृळात मोठं वादळ आलं आहे. कारण या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आलं. दरम्यान, या घटनेनंतर गायब असलेले राठोड अखेर अनेक दिवसांनंतर सगळ्यांसमोर आले आहेत. यवतमाळ येथील त्यांच्या राहत्या घरी गेल्यानंतर आता ते पोहरादेवी मंदिराच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, पूजा चव्हाणच्या चुलत आजीने राठोड यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पोहरादेवी गडावर संजय राठोड यांनी सत्य बोलावं, चुकीचं बोलून समाजाची दिशाभूल करू नये, त्यांनी त्यांच्या कृत्याची कबुली द्यायला हवी अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणची चुलत आजी यांनी दिली आहे. ७ ते २१ फेब्रुवारीपर्यंतची परळी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले..” , खडसे -महाजन वाद सुरू

News Desk

भागवत करडांची यात्रा सर्वात आधी मुंडेंगडावरून!

News Desk

कोरोनाची तिसरी लाट उसळण्याची शक्यता, उद्योगांना कामस्वरुपाचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk