HW News Marathi
महाराष्ट्र

अदार पुनावला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली ? नेमकं काय आहे सत्य ?

मुंबई | संपूर्ण देश सध्या कोरोना या महामारीशी लढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. औषधे, ऑक्सिजन, बेड्स सगळ्यांचीच कमतरता भासत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात देखील सुरु आहे. अशात कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूचे अदार पुनावाला यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती त्यांनी स्वत:दिली होती. याच धमकी देण्याच्या मुद्यावरुन इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सुत्रसंचालक राहूल कनवाल यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.

तर झालं असं की, इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सुत्रसंचालक राहूल कनवाल यांनी शिवसेनेचे गुंड अदार पुनावाला यांना धमकावतात असं म्हटलं होतं. त्यांना म्हणायचं होतं एक आणि म्हणून गेले एक. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले राहूल कनवाल?

काल वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मी सिरम इन्स्टिट्यूटला धमकावत असणाऱ्या नेत्याबद्दल बोललो. तो व्हीडिओ शिवसेनेच्या नव्हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा होता. यामुळे झालेला गोंधळ आणि मनस्तापासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राहुल कनवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुभाष देसाईंचं ‘इंडिया टुडे’ समूहाला पत्र म्हणाले…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भात इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवून राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. राहुल कनवाल यांनी तुमच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कनवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुभाष देसाई यांनी पत्रात केली होती.

काय आहे प्रकरण?

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना जलदगतीने लस पुरविण्याची मागणी करणारे अनेक दूरध्वनी सध्या येत आहेत. त्यामध्ये सामर्थ्यशाली नेते, व्यक्ती अशांचा समावेश आहे. त्यातील काही जणांनी पूनावाला यांना धमक्याही दिल्या आहेत. ही माहिती अदर पूनावाला यांनीच एका वृत्तपत्राला मुलाखतीदरम्यान सांगितली होती.

ते म्हणाले होते की, मला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे, बड्या उद्योगपतींचे व अन्य लोकांचे दूरध्वनी येत आहेत. सर्वांनाच कोविशिल्ड लस त्वरित हवी आहे. प्रत्येकाच्या या लसीबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तिचा पुरवठा लवकर व्हावा या आग्रहापायी दूरध्वनी करणारे माझ्याशी आक्रमक सुरात बोलत असतात”, असं पुनावाला म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार-फडणवीस भेटीवर राज ठाकरे म्हणतात….

News Desk

भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत आज सुनावणी

Aprna

“…अन्य मंडळांचं देखील विलीनीकरण करावं लागेल!” – शरद पवार

News Desk