HW Marathi
महाराष्ट्र

शिवशाहीच्या तिकीट दरांमध्ये कपात, १३ फेब्रुवारीपासून नवे दर लागू

मुंबई । एसटीच्या शिवशाही एसी स्लीपर बसच्या तिकिटाच्या दरांमध्ये कपात होणार असल्याची माहिती मिळत आहे. परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी (८ फेब्रुवारी) हा निर्णय घेतला. राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर येत्या १३ फेब्रुवारीपासून कपात झाल्यानंतरचे नवे दर लागू करण्यात येणार आहे. यामुळे भाड्यात जवळपास २३० ते ५०५ रुपयांनी कपात होणार आहे.

एसटी महामंडळाकडून शिवशाही एसी स्लीपर बसच्या तिकिटांच्या किंमती कमी करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खासगी वाहतुकीची स्पर्धा, तसेच लांब अंतराचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सोपा आणि माफक दरात व्हावा, म्हणून ही दरकपात केल्याचे रावते यांनी सांगितले.

Related posts

Poladpur Bus Accident : आंबेनळी घाट दुर्घटनेतील बस बाहेर काढणार ?

अपर्णा गोतपागर

खोटी आकडेवारी देऊन फसवणूक केल्याबद्दल सरकारने राज्यातील जनतेची माफी मागावीः सचिन सावंत

News Desk

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात

News Desk