HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक! डॉक्टरची कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरनं कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली. महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगरापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे.

पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली. या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करीत होता. मंगळवारी रात्री दोन वाजता डॉक्टरने या महिलेकडून शरीर सुखाची मागणी केली. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करत आरडाओरड केली. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. पीडित महिला रुग्णालयात रडत होती.

घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाली.नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली.बुधवारी झालेला प्रकार प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना कळला.त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.महानगरपालिकेकडून डॉक्टरची हकालपट्टी केल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाटणकर यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन फडणवीसांचा टोला!

News Desk

दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

News Desk

नाशिकमध्ये सैन्य भरती ६३ जागांसाठी २० हजारहून अधिक तरुण

News Desk