HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील धक्कादायक घटना, शेतीच्या वादातून तिघांचा खून

बीड | बीडमधील केज तालुक्यातील मांगवडगाव परिसरात शेतीच्या भांडणातून पारधी समाजाच्या ३ व्यक्तींचा निर्घृण खून तर २ गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी निंबाळकर कुटुंबातील १४ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. या हत्याकांडापूर्वी पारधी समाजातील व्यक्तींना पळून जाता येऊ नये म्हणून त्यांच्या मोटार सायकलीसुद्धा जाळून टाकल्या होत्या. या प्रकरणानंतर घटनास्थळाला पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भेट दिली. ३० ते ४० हल्लेखोर हे ट्रॅक्टरने आले व त्यांनी पाठलाग करून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आले. मयत बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार हे ३ जण आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशन सुरू, प्रकाश गजभिजेंची वेशभूषा

News Desk

सोनिया गांधींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करु नये!- बाळासाहेब थोरात

News Desk

बीड जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ११ कोटी ८ लाख रुपये निधी वितरित !

swarit