HW News Marathi
क्राइम

धक्कादायक! बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून ५ देशातल्या लोकांना घातला कोट्यावधींचा गंडा

बीड । बीड येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर गुन्ह्याअंतर्गत शिक्षा भोगणाऱ्या तरुणानं विविध देशातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांना फसवल्याची बाब उघड झाली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या संबंधित तरुणानं हा गुन्हा दोन तुरुंग अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली येऊन केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
अमर अनंत अग्रवाल असं या गुन्हा करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो बीड येथील रहिवासी आहे. एका फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित तरुण २०१८ पासून मध्य प्रदेशातील भैरवगड कारागृहात शिक्षा भोगत आहे. संबंधित तरुण हॅकर असल्यानं तुरुंगातील अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर जबरदस्ती केली आणि हे काम करायला भाग पाडल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं आहे. यासाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आरोपीला क्रेडिट कार्ड्स आणि लॅपटॉप उपलब्ध करून दिला होता. त्यामार्फत आरोपीनं तुरुंगात बसून अनेकांना कोट्यवधी रुपयांना फसवलं आहे.
संबंधित आरोपीनं परदेशातील लोकांची बँक खाती हॅक करून त्यातील रकमेची अफरातफर केली आहे. अनेक ५ स्टार हॉटेलांना देखील त्याने अशाच प्रकारे फसवलं आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला भोपाळ येथील तुरुंगात हलवलं आहे. अमर अग्रवालने ऑनलाइन फसवणूक करुन हे पैसे हवालाच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय पोलिसांना आहे. यातील काही पैसे संबंधित जेलच्या अधिकाऱ्यांना मिळाले तर काही पैसे अमरने स्वतः साठी ठेवल्याचा संशय आहे. बीडमध्येही हवालाचे पैसे आल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला पोलिसांची आत्महत्या

News Desk

मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक

News Desk

आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

News Desk