मुंबई | कोरोना व्हायरसचा फटका सर्वच व्यवसाय आणि उद्योगधंद्यांना बसला आहे. आता याच कोरोनाचा फटका मनोरंजन क्षेत्राला देखील बसणार आहे,हे स्पष्ट झाले आहे. येत्या गुरूवारपासून म्हणते १९ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरीज यांचं शूटिंग बंद राहणार आहे. याबाबतच निर्णय इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा) कडून घेण्यात आला आहे.
राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह हे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश याआधीच सरकारने दिले आहेत. त्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं शूटिंग देखील बंद राहणार आहे. भारतसरकारने वैद्यकीय आणीबाणी जारी केल्यानंतर इम्पाने हा निर्णय घेतला आहे.
इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा), फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आणि इंडियन फिल्म अँडटेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’च्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याविषयी एक पत्रक जारी करुन माहितीदेण्यात आली आहे. या पत्रकात असं म्हटलं आहे की, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आहोत.
दरम्यान, मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग थांबविण्यात आल्याने आता काही दिवस मनोरंजन क्षेत्रात देखील सगळीकडे शुकशुकाट असणार आहे. दरम्यान, ३० मार्चपर्यंत शूटिंग थांबविण्यात आलं आहे. मात्र, त्यापुढे शूटिंग सुरु होणार की नाही याबाबतचा निर्णय पुढीपरिस्थिती पाहून घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.