HW News Marathi
देश / विदेश

एकीकडे राज्यात कोरोनाची भीती आणि दुसरीकडे मास्क आणि सॅनिटायझर्सचा तुटवडा

मुंबई | देशभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. वुहान येथून सुरुवात झालेल्या या व्हायरसची लागण संपूर्ण देशभरात काळात पसरला. कोरोना व्हायरसची लक्षणे काय तर सर्दी, खोकला पडसे पण या विषाणूमुळे त्वरीत त्याचा संसर्ग होत असल्याने लोकांना कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे. कोरोनाची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी नियमित स्वच्छ हात धुणे, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात ठेवणे तसेच सॅनिटायझर्सचा वापर करावा असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वारंवार सांगतिले. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे N95 मास्क आणि सॅनिटायझर्स यांचा मोठ्या प्रमाणात राज्यात आणि मुंबईत तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभुमीवर अन्न व औषध प्रशासन व राज्याच्या वजन-मापे विभागाने मेडिकल स्टोअर्स विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने मास्कच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. N95 मास्कचे घाऊक पुरवठादार व मास्क आयात करणाऱया कंपन्यांसोबत बैठक घेतली तेव्हा किमान १ लाख एन 95 मास्कचा साठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. वास्तविक प्रत्येकाने N95 किंवा मेडिकल मास्क वापरण्याची गरज नाही. कोरोनाचा संसर्ग झालेला संशयित आणि त्यांची तपासणी करणारे डॉक्टर यांच्यासाठी N95 मास्क अतिशय आवश्यक आहे. रस्त्यातून फिरताना N95 किंवा मेडिकल मास्क वापरण्याची गरज नाही. तोंडावर साधा रुमाल बांधला किंवा साधा कापडी मास्क वापरला तरी पुरेसा आहे, असे राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व नियंत्रण प्राधिकारी विकास बियाणी यांनी सांगितले.

नागरिकांकडून मेडिकल स्टोअर्समध्ये सॅनिटायझर आले का अशी विचारणा करण्यात आल्यावर आमच्याकडे पुरवठाच येत नाही असे सांगण्यात येते किंवा मोठी गुलाबी रंगाचे द्रव्य असलेली बॉटल सॅनिटायझर म्हणून वापरा असे सांगण्यात येते. पण त्याचा उपयोग हात सॅनिटाईझ करण्यासाठी मदत होईल का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. अपुऱ्या N95 मास्कमुळे आणि सॅनिटायझर्स शिवाय कोरोना व्हायरसपासून कसे संरक्षण करावे या चिंतेत सध्या नागरिक आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

News Desk

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ

swarit

वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार – हायकोर्ट

News Desk