HW News Marathi
महाराष्ट्र

सिंचन घोटाळा चौकशीची फाईल तब्बल अडीच वर्षांनी मुख्यमंत्र्यांनी मागविली ?

पवार तटकरेंच्या अडचणी वाढणार

मुंबई – भाजप विरोधातीस वातावरण राज्यात निर्माण होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी एक नवी राजकीय खेळी खेळली आहे. स्विडन दौऱ्यावर जाण्यापूर्वीच त्यांनी बहुचर्चीत सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची फाईल लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून मागवल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. यातून अजित पवार आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकण्याची खेळी मुख्यमंत्री करत असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

तब्बल ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी एसीबी मार्फत सुरू आहे. त्या बाबत मुंबई उच्च न्यायालयात गेल्या महिन्यात माहिती देण्यात आली होती. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनिल तटकरे यांची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यात दोन पाऊले पुढे टाकत ही चौकशी कुठं पर्यंत आली आहे त्याचा अहवाल मागवल्याचे सुत्रांकडून समजत आहे. भाजपला सत्तेत येवून जवळपास अडीच वर्ष होत आहे. पण योग्य वेळी योग्य पाऊल असे धोरण भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी आखले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर कधी दबावल टाकायचा याचे गणित मुख्यमंत्र्यांनी तयार करून ठेवले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी वरून अजित पवार आणि सुनिल तटकरे संपूर्ण राज्यात फिरत आहेत. त्यातून जनतेत सरकार विरोधात असंतोष वाढत आहे. त्याचे प्रतिबिंब सोशल मिडीयावर दिसून आले. म्हणूनच पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याची फाईल काढून पवार तटकरे जोडगोळीवर दबाव टाकण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा सुरू राजकीय वर्तूळात आळवला जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरात भाजपला मोठा धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द

News Desk

जपानहुन आलेल्‍या ६१ परदेशी नागरिकांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

News Desk

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य! – चंद्रकांत पाटील

Aprna