HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याची अवस्था मुंबईसारखी होऊ नये !, महापौरांनी व्यक्त केली भीती

पुणे | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकड्यात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांना कोरोनाची सर्वाधिक झळ बसली आहे. अनलॉकनंतर या शहरांची स्थिती कशी आहे याबाबत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी एच.डब्ल्यू.मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी आज (१२ जून) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी “पुण्याची अवस्था मुंबईसारखी होऊ नये”, अशी भीती महापौर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. मोहोळ यांनी पुण्यातील कोरोनास्थितीबाबत नेमके काय भाष्य केले आहे ? जाणून घ्या

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर पुण्यात काय स्थिती ?

“अनलॉक १ ला नुकतीच सुरुवात झाल्यामुळे इतक्यात नेमकं सांगता येणार नाही, पण गेल्या लॉकडाऊनच्या तुलनेत यंदा पुण्यात कंटेन्टमेंट झोनची संख्या कमी झाली, काही नवे मायक्रो कंटेन्टमेंट झोनही तयार केले गेले. अनलॉकमध्येही गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढतेय पण तितकेच रुग्ण बरे देखील होत आहेत. त्यामुळे आता पुण्यातली सध्याची परिस्थिती पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे”, असा विश्वास पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे.

मुंबईची जी अवस्था झाली ती पुण्याची होऊ नये !

“मुंबईची जी अवस्था झाली ती पुण्याची होऊ नये, याचसाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी स्वॅब टेस्ट वाढविणे ही आपली नितांत गरज आहे. आजपर्यंत पुण्यात ६६,००० स्वॅब टेस्ट्स झाल्या आहेत. दिवसाला २,००० स्वॅब कलेक्शन सुरु आहे. स्वॅब कलेक्शन आणि टेस्टमध्ये फरक आहे. मात्र, स्वॅब कलेक्शन करून रिपोर्ट यायला २ते ४ दिवस लागतात. त्यामुळे, सद्यस्थितीत आपली २ हजार टेस्ट्सची क्षमता नाही. मात्र, यासाठी आपण विशेष प्रयत्न करत आहोत. राजकारण बाजूला ठेवून मी उपमुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत सर्वांना पत्र लिहून याबाबत सांगितले आहे. पुण्यातील स्वॅब टेस्ट वाढवण्यामागची असलेली आवश्यकता मी त्यांना सांगितली आहे. नाहीतर स्थिती नियंत्रणात आणणे अवघड होईल”, असे मोहोळ यांनी सांगितले.

पहा संपूर्ण मुलाखत :

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापुरात पूर, मुंबई चिंब

News Desk

बोगस FIR प्रकरणी सोमय्या आज राज्यपालांची घेणार भेट

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या नियमांना शिवसैनिकांनी दाखवली केराची टोपली!

News Desk