HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ सहा महिलांना मिळणार ‘नारी शक्ती’ पुरस्कार

मुंबई । केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावर्षी देशभरातील एकूण ४४ महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा महिलांना हा पुरस्कार मिळणार आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा दिल्लीच्या राष्ट्रपती भवन येथे पार पडणार आहे. महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्ययाच्या राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांचा सन्मान होणार आहे.

या आहेत महाराष्ट्रातील सहा महिला

१) महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात बियाणांची बँक चालवणाऱ्या ‘बीजमाता’ ऊर्फ राहीबाई पोपरे यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवितात.
२) मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास १५००० पेक्षा अधिक सैनिक प्रशिक्षित केले. शिवाय त्यांनी स्वत: ची शुटींगचे तंत्र विकसित केले आहे. त्यांचे हे तंत्र भारतीय सेनेने देखील स्वीकारले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
३) मुंबईच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यागंना सीमा मेहता यांना कथक नृत्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
४) पद्मश्री पुरस्कार प्राप्त उद्योजिका कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने जो ठसा उमटविला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात येणार आहे.
५) मुंबईच्या स्मृती मोरारका यांनी ‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक हातमाग क्षेत्रातील कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातमाग समुह सुरू केला त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
६ ) सातारा जिल्यातील माण देशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा यांना ग्रामीण क्षेत्रातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योगदानाबद्दल ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Related posts

अर्णब गोस्वामींची लवकर सुटका व्हावी यासाठी राम कदमांची सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा

News Desk

राज्याच्या विकासाचा पुनश्च ‘श्री गणेश’ करण्याचा संकल्प करू! – मुख्यमंत्री

Aprna

देवेंद्र फडणवीसांचं ट्विटद्वारे शरद पवारांवर टीकास्त्र

Aprna