नवी दिल्ली | स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार यंदाचा मान्सून ४ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार दोन दिवसांनी पुढे मागे होण्याचा अंदाज वर्तवला आहे. परंतु मान्सून केरळमध्ये बराच काळ रेंगाळणार आहे. यामुळे महाराष्ट्रात जून महिना कोरडाच राहणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
तसेच महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. यंदाचा मान्सून हा सरासरीपेक्षा कमीच राहणार असल्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबदरम्यान किती पाऊस पडेल याबाबतचा पहिला अंदाज स्कायमेटने याआधीच जाहीर केला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. सरासरीच्या ९३ टक्के इतकाच पाऊस पडेल असे या हवामान विभागाने म्हटले आहे.
लवकरच भारतीय हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागही मान्सून केरळात कधी दाखल होईल याबाबतचा अंदाज येत्या दोन दिवसांत जाहीर करणार आहे. यंदा देशभरात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. गत वर्षीही हवामान विभागाने ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु प्रत्यक्षात ९१ टक्के पाऊस झाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.