HW News Marathi
महाराष्ट्र

एसटीच्या” स्मार्ट कार्ड ” योजनेला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ !

मुंबई | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सदर योजनेला ३० नोव्हेंबर,२०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते.या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठीसंबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ” स्मार्ट कार्ड “काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.

त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.परंतु करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला ३० नोव्हेंबर,२०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री,परब यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#coronavirus : राज्यात पाच जणांचा मृत्यू, दिवसभरातला ‘कोरोना’चा दुसरा बळी

swarit

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली

News Desk

अजित पवारांना पुन्हा झटका; मावस भावाच्या घरावर ED ची छापेमारी

News Desk