HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

…म्हणून अजिंक्य राहाणेंनी केले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे कौतुक

मुंबई | कोरोनामुळे अन्य अनेक क्षेत्रांच्या तुलनेत येत्या काळात पर्यटन क्षेत्राला मोठी झळ बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटरवरून दिली. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधार अजिंक्य राहाणे यांनी कौतुक केले आहे. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच शॅक्स उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती आदित्य ठाकरेंनी दिल्यानंतर अजिंक्य राहाणेंनी यावर प्रतिक्रिया देताना या निर्णयाचे कौतुक केले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत आदित्य ठाकरेंचे कौतुक करताना अजिंक्य राहाणे म्हणतात कि, “महाराष्ट्रात अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत. बीच शॅक्सची ही सुविधा सुरु झाल्यानंतर मला सुमद्रकिनाऱ्यावर जायला नक्की आवडेल. हा एक चांगला पुढाकार आहे.” दरम्यान तर या प्रकल्पाबाबत माहिती देताना आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे कि, “रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर आणि तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली आणि दिवेआगार तर पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या ८ किनाऱ्यांवर पायलट प्रोजेक्ट म्हणून बीच शॅक्स उभारण्यात येणार आहे.”

Related posts

राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली ?, अमित शहांचा सवाल

News Desk

…तर चंद्रकांत पाटील अन् फडणवीसांनी इगतपुरीला जाऊन विपश्यना करावी !

News Desk

पवार कुटुंबाची उद्या महत्त्वाची बैठक, अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार

News Desk