HW News Marathi
महाराष्ट्र

‘…तर “तो” प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा’- संजय राऊत

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या घटनांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवून दिली आहे. आणि अश्यातच या प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता शिवसेनेनं एनसीबी पथक आणि केंद्र सरकारवर अर्थातच मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आर्यन खान याच्यासंदर्भात न्यायालयाने दिलेले आदेश अद्याप मी सविस्तर वाचलेले नाहीत. मात्र न्यायालयाने आर्यन खानला ‘क्लीनचिट’ दिली असेल तर केंद्रीय तपास यंत्रणा यांनी हे प्रकरण कशासाठी घडवले गेले, याची चौकशी करावी लागेल, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलेलं असतानाच सत्ताधारी शिवसेनेनंही आता या प्रकरणात उडी घेत म्हटल आहे ‘या प्रकरणामुळे एनसीबीचं थोबाड फुटलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा व आदर साफ धुळीस मिळाला

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात जो खेळ चालवला आहे, त्याची पोलखोल रोजच होत आहे. अभिनेता शाहरूख खानच्या मुलाविरोधात अमली पदार्थ बाळगल्याचा, सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन मोबाईलवरील संभाषणातही खानच्या कटकारस्थानासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले. याचा अर्थ एनसीबीच्या टोळीने हा सर्व बनाव रचला आणि आर्यन खानसह इतर मुलांना वीस पंचवीस दिवस नाहक तुरुंगात डांबले. आर्यनविरोधात एनसीबीच्या आरोपात तथ्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण असेल तर या पोरांना अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा. एनसीबीच्या वादग्रस्त कारवायांच्या खोटेपणाचे रोज नवे पुरावे समोर येत आहेत व त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा व आदर साफ धुळीस मिळाला आहे. असं मत आजच्या सामना अग्रलेखातून मांडण्यात आल आहे.

केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात महाराष्ट्रात रोष

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करून खंडणी, गाडी – घोडे उकळणारे टोळभैरवच बनले होते. भारतीय जनता पक्षाचे लोक या टोळभैरवांच्या खंडणीखोरीचे समर्थन करीत होते. एनसीबीच्या टोळीचे कारनामे पुराव्यांसह समोर आणण्याचे चोख काम मंत्री नवाब मलिक यांनी केले हे महाराष्ट्रावर मोठे उपकारच झाले. स्वतः मलिक यांच्या जावयावर याच टोळधाडीने खोटे गुन्हे दाखल करून फिल्मस्टार, त्यांची मुले, व्यापारी, राजकारण्यांचे नातेवाईक यांना अशा प्रकरणात फसवून खंडण्या उकळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या सगळ्या घटनाक्रमावर आपला संताप व्यक्त केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तुरुंगातील प्रत्येक दिवसाची किंमत मोजावी लागेल असे पवार यांनी फटकारले आहे. आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पळून गेले. त्यांचा ठावठिकाणा कोणाला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयानेच परमबीर कुठे आहेत ? असा सवाल केला आहे.

पंतप्रधान मोदी त्या मंत्र्यांच्या मांडीस मांडी लावून बसता

त्या ‘ फरार ’ अधिकाऱ्याच्या आरोपांवर अनिल देशमुख तुरुंगात आहेत. लखीमपूर खिरीत आंदोलक शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या मंत्रिपुत्राविरुद्ध प्रचंड संताप आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, पण अजय मिश्रा यांचा राजीनामा न घेता पंतप्रधान मोदी त्या मंत्र्यांच्या मांडीस मांडी लावून बसत आहेत. हा कोणता न्याय ? कायद्याचे, नियमांचे बडगे फक्त राजकीय विरोधकांना, बाकी सगळय़ांना मोकळे रान ! अशी संतप्त भावना आजच्या सामना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंना दणका, सिंधुदुर्गातील 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

News Desk

एनसीबीने बॉलिवुड आणि ड्रग्सचा तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास करणार- गृहमंत्री

News Desk