HW News Marathi
महाराष्ट्र

‘म्हणून नवाब मलिक यांनी वकिली सुरू केली, शाहरुखच्या मुलाचं वकीलपत्र घेतलं!’

परभणी। मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक हे सातत्याने आरोपांच्या फैरी झाडत आहेत. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे हे भाजपसाठी सेलिब्रिटींना लक्ष्य करून वसुली करतात असा आरोप करताना अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर करण्यात आलेली कारवाई बोगस असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. त्याचवेळी वानखेडे यांच्यावर वैयक्तिक आरोपही मलिक यांनी केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली.

खोटं बोल पण रेटून बोल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्लॅन केला, असा आरोप मंत्री वडेट्टीवार यांनी केला. यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. “महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोके तपासून घेण्याची वेळ आली आहे. ज्याला जे सुचेल ते तो बोलतोय. खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था महाविकास आघाडीच्या नेत्यांची झाली आहे. गडकरी आमचे नेते आमचे पालक आहेत. ते आमची सगळ्यांची काळजी घेतात. वडेट्टीवार यांनी कोठून शोध लावला हे माहिती नाही,” अशी टोलेबाजी चंद्रकांत पाटील यांनी केली.

राज्यातील दुसरा कोणताच प्रश्न दिसत नाही

‘गेल्या पंधरा दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांना शाहरुख खान याचा मुलगा सोडला तर राज्यातील दुसरा कोणताच प्रश्न दिसत नाही. बहुदा सरकार जाण्याची चाहुल त्यांना लागली असेल. त्यातूनच बेरोजगार होण्याच्या भीतीने त्यांनी वकिली सुरू केली असावी आणि शाहरुख खानच्या मुलाचं पहिलं वकीलपत्र त्यांना मिळालं असावं असं मला वाटतंय’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

या गोष्टीचं खंडण करतो

तसेच “वारंवार गेल्या 15 दिवसांपासून माझी मृत आई, माझे निवृत्त वडील आणि बहिणीवर घाण शब्दांमध्ये टीका केली जात आहे. मी या गोष्टीचं खंडण करतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करतोय. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटीड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या नगरपालिका आणि महानगरपालिकांना निधी कमी मिळाला, कॉंग्रेसची पुन्हा एकदा नाराजी

News Desk

…आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटले प्रशांत किशोर; पंजाब निवडणुकीवर रणनितीची शक्यता

News Desk

सुप्रिया सुळेंपाठोपाठ प्रफुल्ल पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट, नितेश राणे यांनी केलं रिट्विट

News Desk