HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

नाशिक | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा या लग्न सोहळ्यात बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. या लग्नसोहळ्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित होते. या लग्न सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

निफाडचे राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह अनेक शासकीय अधिकारी ही उपस्थित होते. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पुरती पायमल्ली करण्यात आलीय. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्या फटाक्यांची आतषबाजीसुद्धा करण्यात आली होती.

या लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिल्याचे पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून हे नियम पायदळी तुडवण्यात आल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ पुण्यात उद्या आंदोलन

News Desk

‘कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात मोठी शिथिलता’, अशी असेल नियमावली!

News Desk

‘गायकवाड अहवाल हा उद्धव ठाकरेंना समजलाच नाही’, संभाजी पाटील निलंगेकरांची टीका

News Desk