HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंना अंबेजोगाई न्यायालयाकडून जामीन मंजूर

बीड । बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील पूस येथील साखर कारखाना जमीन प्रकरणात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज (४ एप्रिल) अंबेजोगाई येथील न्यायालयात आले होते.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या प्रकरणात २०१८ साली दाखल गुन्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्या. पाटील यांनी जामीन मंजूर केला.

२०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पकड वारंट निघाल्याने धनंजय मुंडे यांनी न्यायालासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा, प्रार्थना करणाऱ्या सर्वांसह राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार

News Desk

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३२०२,कोरोना बाधित ३०० रुग्ण बरे होऊन घरी । राजेश टोपे

News Desk

ज्याची भीती होती तो वातावरण बदलाचा धोकादायक टप्पा सुरू झाला आहे.

News Desk