HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मेसेजकरून केली तब्येतीची विचारपूस

बीड | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा किरोनाची लागण झाली. याबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांची मेसेजद्वारे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे धनंजय मुंडेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. कोरोना अद्याप गेलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहावे, असे आवाहन त्यांनी बीज जिल्ह्यातील जनतेला केले आहे. यावेळी नागरिकांना मास्क आणि सिनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे, असे आवाहन धनंजय मुंडेंनी केले आहे. 

माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये सुद्धा पंकज मुंडेंना कोरोनाची लागण झाली होती. आता पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच राज्यात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. राज्यात १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली, तर सरकार कठोर निर्बंध लावू शकते, असे स्पष्ट संकेत पवारांनी काल (१ जानेवारी) कोरोगाव-भीमा जयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ

News Desk

जे. पी. नड्डा आणि चंद्रकांत पाटील यांना पाठवली नोटीस,  कार्यकारिणीची निवड करताना विश्वासात न घेतल्याचा भाजप कार्यकर्त्याचा आरोप

News Desk

‘माझ्याशी संबंधीत कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीसही नाही’, ITच्या कारवाईवर अजित पवारांचं स्पष्टीकरण

News Desk