HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूर-गाणगापूर एसटी अपघातातील जखमींसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मुंबई | सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून चौकशी केली. यावेळी त्यांनी शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी असून तुम्हाला चांगले उपचार मिळवून देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयात हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. या अपघातात एकूण 18 प्रवासी जखमी झाले असून सगळ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. यातील अनेक प्रवाशांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे, तर 6 प्रवासी अद्यापही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपूते, आणि माजी महापौर महेश कोठे हे देखील सोलापूर जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे !

News Desk

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख!

News Desk

आईच्या हत्या प्रकरणी मुलाला जोधपूर येथूनअटक

News Desk