HW News Marathi
महाराष्ट्र

मागासवर्गीय सुशिक्षितांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणार | राजाभाऊ सरवदे

मुंबई | महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळा द्वारे राज्यातील मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळवून देऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणार असल्याचा निर्धार महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केला. येथील बॅलार्ड इस्टेट मधील महामंडळाच्या कार्यालयात अध्यक्षपदाचा कार्यभार सुधाकर उर्फ राजाभाऊ सरवदे यांनी स्वीकारल्यानंतर मागासवर्गीय सुशिक्षतांना रोजगार मिळवून देण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नवनियुक्त अध्यक्ष राजभाऊ सरवदे यांना शुभेच्छा देण्यासाठी महात्मा फुले महामंडळाच्या मुख्य कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती.

यावेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; सुरेश बारशिंग; दिपकभाऊ निकाळजे; कमलेश यादव; अनिल गांगुर्डे;रमेश गायकवाड;सुमीत वजाळे; भीमराव सवातकर; ऍड. बी के बर्वे; सोमनाथ भोसले; संतोष पवार; हेमांर रणपिसे; एड. आशाताई लांडगे; शिलाताई गांगुर्डे; संगीताताई आठवले; एड. अभयाताई सोनवणे; उषाताई रामळू; सौ नैनाताई वैराट; चंद्रशेखर कांबळे; सोना कांबळे; सिद्धार्थ कासारे; प्रकाश जाधव;बाळासाहेब गरुड; हरिहर यादव; सचिन मोहिते;

आदी अनेक मान्यवर तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक रिपाइं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापन कंपनी कायद्यानुसार 1978 मध्ये करण्यात आली आहे. या महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या सोहळ्यास प्रचंड गर्दी झाली ती आज राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी झाली असून केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवलेंनी सरवदे यांची योग्य निवड केल्याची भावना येथे आलेल्या अनेकांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मागील 44 वर्ष एकनिष्ठ राहून साथ देणारे राजाभाऊ सरवदे सोलापुरात लोकप्रिय लोकनेते झाले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारताना महात्मा फुले मागासवर्गीय अर्थीक विकास महामंडळाच्या कार्यलयात एव्हढी प्रचंड गर्दी झाली होती की एव्हढी गर्दी या महामंडळाच्या इतिहासात या कार्यलयात कधीच झाली नव्हती असे येथील लोक बोलत होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार समाजकार्य निळ्या झेंड्याशी, नेते रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठपणे काम करीत आल्यानेच माझ्यावर त्यांनी ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली असून या पदास आपण न्याय देऊ तथा कोणतेही चुकीचे काम करून नावाला कलंक लागू देणार नसल्याची ग्वाही राजाभाऊ सरवदे यांनी दिली. मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी या महामंडळातून कर्ज उपलब्ध करून देणार ज्या योजनेत केवळ 5 लाख कर्ज मिळते त्यात 25 लाखांपर्यंत वाढ करणार असल्याचे राजाभाऊ सरवदे यांनी जाहीर केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्थिक संकट लक्षात घेता, येत्या काळात वैयक्तिक जीवनात काटकसरीने काम करा !

swarit

मराठा आरक्षणावरुन निलेश राणे आक्रमक  

News Desk

“फडणवीसांनी केलेल्या सूचनांचा विचार करू!”, चर्चेनंतर परबांचे सूचक वक्तव्य

News Desk