HW News Marathi
Covid-19

सोनिया गांधींनी २२ मे रोजी बोलावली सर्व विरोधी पक्षांची बैठक

नवी दिल्ली | काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २२ मे रोजी म्हणजेच येत्या शुक्रवारी विरोधी पक्षांची बैठक बोलविली आहे. या बैठकीला एकूण १७ पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, मोदी सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज आणि भाजपकडून कामगार कायद्यात करण्यात आलेले बदल या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या ! | नाना पटोले

News Desk

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्याने ३१ मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

News Desk

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता ३१ डिसेंबर घरीच साजरा करा! – शंभूराज देसाई

Aprna