HW News Marathi
देश / विदेश

पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे!

नवी दिल्ली। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि आणि इतर आघाडी सरकारची काल(२० ऑगस्ट) बैठक पार पडली गेली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि चर्चेचा विषय बनला आहे. स्वातंत्र्य चळवळीने देशाला दिलेली मूल्ये मानणारे सरकार २०२४च्या लोकसभा निवडणुकांनंतर सत्तेवर आणायचे आहे, असा निर्धार करून बिगरभाजप पक्षांनी आपली धोरणे आखावीत, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. हे ध्येय आपण एकजुटीने साध्य करू. त्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायही नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.

राज्यांच्या व राज्य सरकारांच्या अधिकारात ढवळाढवळ

या बैठकीत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले गेले होते. केंद्र सरकारने सहकार हे नवीन खाते स्थापन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी दिली आहे. केंद्राची ही कृती म्हणजे राज्यांच्या व राज्य सरकारांच्या अधिकारात ढवळाढवळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते.

बिगरभाजप राज्यांना लसपुरवठा करण्यात केंद्र सरकार पक्षपात करीत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याचाही उल्लेख सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात केला आहे.

अत्यंत उद्धट पवित्रा केंद्र सरकारने घेतला

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खूप गोंधळ झाल्याने बऱ्याच वेळा संसद तहकूब करण्यात अली होती. यावर सोनिया गांधी म्हणाल्या, “सार्वजनिक महत्त्वाच्या व तातडीच्या विषयांवर संसदेमध्ये चर्चा न करण्याचा अत्यंत उद्धट पवित्रा केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे संसदीय पावसाळी अधिवेशन अक्षरश: वाया गेले. या अधिवेशनात विरोधकांनी दाखविलेली एकजूट संसदेच्या आगामी अधिवेशनांमध्येही कायम ठेवावी”, असे आवाहन काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे.

येणाऱ्या निवडणुकांची तयारी

काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांशी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी नेते हजर होते.

समस्या सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले

देशापुढील सर्व समस्या सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सेक्युलर विचारसरणी व लोकशाहीवर विश्वास असलेल्या सर्व पक्षांनी सध्याच्या स्थितीचा विचार करून एकत्र येण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिगरभाजप पक्षांच्या बैठकीत सांगितले. ते म्हणाले की, सर्व प्रश्नांवर एकत्रितरीत्या चर्चा करण्याऐवजी प्राधान्यक्रमाने एकेक प्रश्न घेऊन तो सोडवूया. त्यातून देशाला उत्तम भवितव्य देण्याचा प्रयत्न करूया, असेही आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी शिवजयंतीनिमित्त मराठीतून शुभेच्छा

News Desk

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

swarit

#Budget2020 : यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना मिळाला दिलासा

News Desk