HW News Marathi
देश / विदेश

‘विधानसभा अध्यक्षाची निवड न केल्याने पक्षश्रेष्ठी नाराज’, सोनिया गांधींच्या रडावर ‘हे’ नेते

मुंबई | दोन दिवसीय विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला पार पडलं. या अधिवेशनात अनेक वादविवाद झाले आणि राजिक्य घडामोडींना वेगळं वळण मिळालं आहे. परंतु या अधिवेशनात अध्यक्षाची निवड न केल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज झाले आहे. या संदर्भात नक्की काय झाले, त्याची माहिती द्या, अशी विचारणा काही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीहून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आमदारांच्या मतदानावर विश्वास नव्हता तर, गुप्त मतदानाची अट बदलून नियम समितीत त्यात बदल घडवून आणता आला असता.

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आग्रही मागणी का केली नाही?

विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याने राजिक्य वातावरण बिघडल्याचं दिसून येतंय. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (६ जुलै) यासंदर्भात बैठक घेण्यात आली ती आधी का घेण्यात आली नाही? भारतीय जनता पक्षाच्या १२ सदस्यांचे निलंबन केल्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आग्रही मागणी का केली नाही? असे प्रश्नही संबंधित नेत्यांना विचारण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही, हे राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून श्रेष्ठींना कळवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी या विषयी नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विचारणा केली जाणार आहे.

काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादी कडून हवातसा प्रतिसाद मिळाला नाही

दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाच्या काही मंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या समन्यवय बैठकीत केली होती. मात्र, आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून तेवढा प्रतिसाद काँग्रेसला मिळू शकलेला नाही. त्यामुळे याही अधिवेशनात काँग्रेसची अध्यक्ष निवडीची अपेक्षा पूर्ण झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, पेट्रोल १२ पैशांनी महागले

swarit

“प्रत्येक भेटीत राजकारण का काढता?”, पवार-मोदी भेटीवर राऊतांचा सवाल

News Desk

सुषमा स्वराज यांना ‘पंतप्रधान’पदाचा उमेदवार म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी दिला पाठिंबा

News Desk