HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या ED कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

मुंबई | दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मलिकांच्या ईडी कोठडीचा आज (३ मार्च) शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी आज सुनावणी पार पडली. यावेळी मलिकांच्या ईडी कोठडीत पुढील आदेश येईपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

२५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान मलिकांची तब्यात ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे गेल्या दिवसांपासून चौकशी करणे शक्य झाले नाही. यामुळे मलिकांच्या ईडीच्या चौकशीत वाढ करण्याची मागणी ईडीच्या वकिलानी न्यायालयात केली. न्यायालयात दोन्ही बाजुचा युक्तीवाद संपल्यानंतर मलिकाच्या कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली. 

ईडीचे वकील अनिल सिंह यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना म्हटले, “दाऊदची बहिण हसीना पारकर यांच्या मुलाचा जबाब न्यायालयाने नोंदविला आहे. त्या व्यतिरिक्त जेलमध्ये असलेला दाऊतचा भाऊ इक्बाल कासकर यांची देखील ईडीने चौकशी केली आहे. या प्रकरणात अनेकांच्या चौकशी करून गैरव्यवहाराची माहिती जाणून घेऊन तपास करावा लागणार आहे. यामुळे महिलांच्या ईडीच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.”

  याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान मलिकाचे दाऊदच्या टोळीचे संबंध असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले होते. त्यावेळी मलिक हे टेरर फंडिंगमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे म्हटले होते. तेव्हा दाऊदची बहिण हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचा आरोप मलिकांनावर केला होता. परंतु, ईडीने आज त्यांच्या अर्जात म्हटले की, गेल्या वेळी ५५ लाख रुपयांची बाब ही टायपिंग मिस्टेक असून ती फक्त पाच लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसा, प्रतिक्षा, रामायण हे फिल्मसिटीचं वैभव, हे वैभव सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहात का? राऊतांचा योगींना सवाल 

News Desk

राज्यात आज ७ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’

News Desk

वाद पेटला! संजय राऊत यांची चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस

News Desk