मुंबई | आजपासून (१ सप्टेंबर) सुरू झालेल्या ‘जेईई’च्या, आणि १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची प्रवासचिंता अखेर दूर झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने काल (३१ ऑगस्ट) रेल्वे प्रवासाची परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेनेही जेईईच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
WR will run 46 additional special suburban services in Mumbai from 1st September to 6th September, 2020 for the convenience of JEE candidates.
These services will be in addition to existing 350 special suburban services. #JEE2020 #JEEMain #JEEMain2020. pic.twitter.com/Rt50hhMDlD
— Western Railway (@WesternRly) September 1, 2020
“जेईई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ४६ अतिरिक्त रेल्वे गाड्या सो़डण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत या गाड्या सोडण्यात येतील. तसंच यापूर्वी चालवण्यात येणाऱ्या ३५० ट्रेन व्यतिरिक्त या ट्रेन धावतील,” अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेनं यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.