मुंबई | देशात कोरोना संख्या वाढून १ लाख ५८ हजार ३३३ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासात ६ हजार ५६६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. आणि १९४ कोरोनामुळे मृत्यू असून देशभरात आतापर्यंत ४ हजार ५३१ लोकांचा कोरोनामुळे प्राण गमावले आहे. तसेच देशात आतापर्यंत ६७ हजार ६९२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात सध्या ८६ हजार ११० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
Spike of 6,566 new #COVID19 cases & 194 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 1,58,333 including 86110 active cases, 67692 cured/discharged/migrated and 4531 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/dWooiagKwN
— ANI (@ANI) May 28, 2020
देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. महाराष्ट्रात काल (२७ मे) कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.