HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी आणि वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड !

– दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

मुंबई राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी आणि वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. तर महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणसह संहयोगी कंपनीच्या जवळपास ७७ हजार कर्मचाऱ्यांना १३ हजार ५०० सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शिवाय उर्जा विभागातील कंत्राटी कामगारांना ७ हजार ५०० रूपये सानुग्रह अनुदानाची घोषणाही केली आहे. त्यामुळे या दोन विभागातील कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीसह ११ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. बोनस आणि महागाई भत्ता यामुळे एसटी महामंडळावर तब्बल १४० कोटींचा बोजा पडणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?

News Desk

कोश्यारीजी इतका अभ्यास बरा नाही; राऊतांचा टोला

Aprna

राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार

Aprna